बांदा (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन
कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील तालुकास्तर शिबीर कार्यक्रमाचे जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
देवगड तालुक्यासाठी ३ जुलै, ६ ऑगस्ट, ३ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, ६ नोव्हेंबर, ४ डिसेंबर, कणकवली तालुक्यासाठी ४ जुलै, ७ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ९ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर, ५ डिसेंबर, मालवण तालुक्यासाठी १० जुलै, १३ ऑगस्ट, १० सप्टेंबर, १६ ऑक्टोबर, १३ नोव्हेंबर, ११ डिसेंबर, वेंगुर्ला तालुक्यासाठी ११ जुलै, १४ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर, १४ नोव्हेंबर, १२ डिसेंबर, सावंतवाडी तालुक्यासाठी १८ जुलै, २१ ऑगस्ट, १८ सप्टेंबर, २३ ऑक्टोबर, २० नोव्हेंबर, १८ डिसेंबर, दोडामार्ग तालुक्यासाठी १९ जुलै, २२ ऑगस्ट, १९ सप्टेंबर, २४ ऑक्टोबर, २१ नोव्हेंबर, १९ डिसेंबर या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.