कुडाळ प्रतिनिधी
भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आज बाव येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाव तसेच रामेश्वर विद्यालय बाव येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती श्री अभय परब, युवा मोर्चाचे श्री श्रीपाद तवटे, बाव माजी सरपंच श्री नागेश परब, बांबुळी सरपंच श्री प्रशांत परब, ग्रा. प. सदस्य श्री सुनील वेंगुर्लेकर, श्री प्रमोद कदम, श्री रवींद्र नेवाळकर, विजय गावकर, संतोष मेस्त्री,भाई कदम, मधुकर कांबळे,शरद कांबळे, यज्ञेश परब तसेच पूर्ण प्रा, शाळा बांव मुख्याध्यापक सौ वालावलकर, जांभवडेकर, सावंत रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनिल खोत, पवार सर, खोत सर, वेतुरेकरसर, पवार मॅडम, अन्य कर्मचारी वृन्द व शालेय विद्यार्थी व बाव ग्रामस्थ उपस्थित होते.