कुडाळ येथे २ लाख ८८ हजारांचा अवैध गुटखा जप्त..
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात आली कुडाळ प्रतिनिधी येथील एका पान टपरीवर २ लाख ८८ हजारांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शमसुद्दीन करोल, इम्तियाज शमसुद्दीन करोल (दोघे रा. करोलवाडी, कुडाळ), आरिफ करोल…
