महिलेची चैन हिसकावण्याचा युवकाचा प्रयत्न
डिगस – चोरगेवाडी परिसरातील घटना कुडाळ प्रतिनिधी पणदूर घोडगे रस्त्यानजिक डिगस-चोरगेवाडी फाटा ते सुर्वेवाडी दरम्यान एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय युवकाने केला. मात्र त्या महिलेने प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. त्यानंतर तेथून पलायन केलेल्या त्या युवकाला पणदूर येथे ग्रामस्थांनी पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. हि…
