कणकवली (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, शुभम दुडये, तुषार एरंडे, प्रतिपा पाटील, स्नेहा लोखंडे यांच्यासह कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराणा राजा प्रताप यांच्या प्रतिमेला सर्वगोड व जोशी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराणा प्रताप म्हणजे विरता, साहस आणि मातृभूमीप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक आहे. महाराणा प्रताप यांचा मातृभक्तीचा वारसा आज संपूर्ण भारतवासीयांना मार्गदर्शक असल्याचे अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.