११ डिसेंबर “जागतिक पर्वत दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन.. वैभववाडी प्रतिनिधी दि.११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी ११ डिसेंबर,२०२४ रोजी जागतिक पर्वत दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हा गिर्यारोहण संघटना, विविध गिर्यारोहण संस्था, गडप्रेमी, पर्वतप्रेमी, निसर्गप्रेमी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी…