सिंधुदुर्ग जिल्हा ६ लाख ७२ हजार मतदार बदलणार मतदानाचा हक्क
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा,जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ३ विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात…
