नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;२ डिसेंबर रोजी मतदान,३ डिसेंबरला निकाल
मुंबई प्रतिनिधी राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर झाला असून, यामध्ये २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज, ४ नोव्हेंबरपासून, या भागांमध्ये आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी आणि निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होईल….
