बादा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले
प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.. 🎤बांदा (प्रतिनिधी)मुसळधार पावसाने तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली असून बांदा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवण्याची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बांदा परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रीच तेरेखोल नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने शहरातील आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला…