गोठोस श्री देवी भावई चा उद्या जत्रोत्सव
माणगाव (गोठोस) गोठोस गावचे जागृत देवस्थान श्री देवी भावई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या होणार आहे. यानिमित्ताने सकाळपासून धार्मिक कार्यक्रम तसेच रात्री पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.