कोकणचे पहिले सैनिक स्कूलः ‘भोसले सैनिक स्कूल’, सावंतवाडीला अधिकृत मान्यता
सावंतवाडी (प्रतिनिधी) संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या सहकार्यातून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले सैनिक स्कूल’ या शाळेला नुकतीच अधिकृत मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण मान्यतेमुळे कोकणातील पहिले सैनिक स्कूल उभारले जात असून, ते चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात साकारले जाणार आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले यांनी…
