उबाठा आणि आघाडीचा पराभव होणार असल्यामुळेच भाजप नेते,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची भीती वाटते

दौऱ्यावर टीका करणाऱ्या उबाठा चे राऊत ना भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी सुनावले

कणकवली प्रतिनिधी
देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे उबाठा आणि संजय राऊतला मिरच्या लागत आहेत. भाजप कार्यकर्ता मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटने साठीची निष्ठा गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कडून ठाकरे आणि राऊत यांनी शिखवी. तुला आणि घर कोंबड्या मालकाला अमित भाई यांचे कर्तृत्व आणि पक्ष निष्ठा समजणार नाही .तुझ्या मालकाने शिवसैनिकाना,आमदार आणि जिल्हा प्रमुखांना मुख्यमंत्री असताना भेट दिली असती तर पक्ष फुटला नसता आणि तुमची अशी अवस्था झाली नसती. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अमित भाई शहा यांचा आदर्श घ्यावा असा सल्ला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले
अमित शहा हे जेष्ठ नेते असून बलवान व कार्यतत्पर नेते आहे. त्यांच्याकडे देशासाठी आणि पक्षासाठी वेळ आहे.त्यांनी देश हिताचे जे निर्णय घेतले त्या नंतर जनतेने देशभर ते स्वीकारले म्हणून आजही देशात व्यवस्थित शांतता आहे. त्यामुळे संजय राऊत ने लडाख, काश्मीरपेक्षा पत्राचाळीत जाऊन सभा घ्यावी मग त्याला चप्पल पडतील आणि स्वतःची लायकी कळेल. २०१४ पासून अमित भाई येत आहेत. तुझा मालक भेटीला जायचा तेव्हा तुम्हाला त्यांच्या दौऱ्यांचा फायदा व्हायचा आता तुमचा पराभव होणार असल्यामुळे अमित भाई यांच्या दौऱ्याची भीती उबाठा पक्षाला वाटू लागली आहे.
ज्यांनी वापराने फेका यात संजय राऊत याचा मालक उद्धव ठाकरे यांची पी एच डी झालेली आहे. त्यांनी तर सख्खा भाऊ चुलत भाऊ यांचा वापर करून फेकून दिले. शिवसेनेचे नेते असलेले एकनाथ शिंदे साहेब, राणे साहेब, गणेश नाईक, चुलत भाऊ राज साहेब, स्वतःचा सख्खा भाऊ यांच्या हवतेव्हा वापर केला आणि फेकले.भाजप हा मित्र पक्षांना घेवून त्यांना मोठे करणारा आहे.संजय राऊत ने “मुंगेरी लाल चे हसीन सपने” पाहू नयेत. भाजप आणि महायुतीचे पुन्हा सरकार येणार आहे.आणि संजय राऊत आमच्या मिरवणुकीत नाचणार सुद्धा आहे असा टोला लगावला.
देवा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षित केले आहे.कार्यासाठी सभ भूमी देवा भाऊ ची आहे. आणि तुझ्या मालकाची मातोश्री २ ही देवभाऊंची कृपा आहे. हे राऊत ने विसरू नये.
अक्षय शिंदे संत-महात्मा होता का? त्याला पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षे साठी मारला तर ठाकरे,तुतारी वाले ,काँग्रेस यांना दुःख का झाले. तुम्हाला पोलिसांचे बळी पाहिजे हेते काय ? कोणाची बाजू घेता ? यांचा तरी विरोधकांनी विचारा करावा अशा शब्दात सुनावले.
राजकोट दुर्घटना घडली त्यानंतर पालकमंत्री रवी चव्हाण यांनी ,मुख्यमंत्री ,उप मुख्यमंत्री यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल. असे जाहिरात केले होते. पहिल्या झालेल्या चुका आता होणार नाही. आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असा शिवरायांचा पुतळा निर्माण होईल.
*असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत असेल तर चुकीचे ढोल बडवू नका*
*चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,मुळात ही संस्था बावनकुळे साहेबांची नाही. ते फक्त त्या संस्थेवर अध्यक्ष आहेत.
त्या संस्थेच्या माध्यमातून जे काही मोठे शैक्षणिक कार्य होते. असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले जात आहे. एका चांगल्या कामासाठी जर सरकारने मदत केली असेल त्याचा विरोधकांनी उगाचच ढोल वाजवू नये.
संस्थेच्या माध्यमातून एक चांगले काम होत असेल आणि सरकार त्याला प्रोत्साहन देण्याचे काम करत असेल त्याच्यावर टीका करू नये असे आमदार नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page