गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला सावंतवाडी महावितरणच्या पुढील तयारीचा आढावा*
सावंतवाडी: कोकणातील मुख्य सण गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशोत्सव कालावधीत आणि उत्सवपूर्व गणेश शाळांना अखंडित वीज पुरवठा व्हावा तसेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवावेत यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता श्री शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील इतर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना देखील उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. यावेळी सहा.अभियंता श्रीम.वीणा मठकर,…
