हळदीचे नेरूर गावची कन्या अनिशा पालकर भारतात तिसरी

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वसलेल्या
हळदीचे नेरूर या गावची सुकन्या असणाऱ्या कु. अनिशा आनंद पालकर हिने सी.बी.एस.सी. बोर्डात ९९.३०% गुण मिळवत भारतात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिला इंग्लिश, मराठी व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून विज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विषयात प्रत्येकी ९९ गुण मिळाले आहेत. सी.बी.एस.सी. सारख्या अवघड परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page