रस्त्यात गाय आडवी आल्याने रूग्णवाहिका पलटी
सावंतवाडी प्रतिनिधी गोवा येथून खाजगी रुग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने जात असताना माजगाव येथील मांडव हॉटेल नजीक रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमे वृद्ध महिलेसह रुग्णवाहिकेतील तिच्या सहकारी परिचारिकांना १०८…
