आंबोली मुख्य धबधब्यावर कर आकारणी विरोधात ग्रामस्थ ठाम,आंदोलन छेडणार ग्रामस्थाचा पवित्रा

आंबोली (विष्णू चव्हाण)
आंबोली धबधब्यावर दरवर्षी वाहतूक कोंडी होते त्याचा निर्णय वनविभाग व पोलीस प्रशासनाने घेण्याचा आहे असे काल झालेल्या आंबोली,चौकुळ ग्रामस्थ व प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.आंबोली धबधब्यावर शासकिय निधी चा एकही रुपया लागलेला नसताना तसेच धबधबा हा नैसर्गिक आहे, कृत्रिम तयार केलेला नाही तर आपल्याला पर्यटकाकडुन कर शुल्क कशी वसुल करु शकतो ,हि आंबोली ची पर्यटकांकडून होणारी बदनामी आहे .याचा परिणाम पर्यटनावर होणार असल्याने ग्रामस्थ विरोधाचा पवित्रा घेतला आहे. वनविभाग याने गेल्या चार वर्ष पुर्वी कर वसुली केलेली होती ,वीस लाख रुपये जमा आहेत त्या निधी चा वापर धबधब्याच्या डागडुजी साठी केला काय? असा प्रश्न समोर येत आहे.त्या वीस लाख कुणी खर्च केले त्या चा हिशोब आज पर्यटकच विचारत आहेत. शासनाच्या या आडमुठ्या नियोजन मुळे स्थानिक व्यवसाईक व्यवसायापासुन वंचित राहीला आहे. आज तो व्यवसाईक कर्जबाजारी आहे. वीजबिल पाणी,आणि डागडुजी करुन हैरान झालेला आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा अन्याय नको ?वाहतूक व वाहनतळ ,शाैचालय हे प्रशासनाकडून न सुटलेले प्रश्न आहेत ते पुन्हा पुन्हा ऐरणीवर घेण्याची गरज नाही. सर्व पर्यटन स्थळांची पहाणी केली तर रस्ते दुरावस्था हि जीव घेणे आहे. रस्त्यामुळे काही पोईंट बद करावे लागतील.हि दुरवस्था आंबोली पर्यटनाची झालेली आहे. या पाच वर्षानी हे आंबोली पर्यटन बंद होते की काय अशी भिती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page