कोकणात वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्र प्रतिनिधी राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आठवडाभर वादळी पावसाचे वातावरण असले तरी त्यानंतर उन्हाच्या चटक्यासह उकाडा अधिक वाढणार आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी (दि. १८) ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद…
