मंत्री केसरकर विशाल परब राजन तेली सौ.अर्चना घारे परब यांची उपस्थिती
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी येथे नगर पंचायत हॉल येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असलेली व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग वतीने गुणगौरव कौतुक सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांची एकाच मंचावर उपस्थित पाहायला मिळाली. त्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाल्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आले तसेच महिला बचत गटांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला. दिनेश गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन यावेळी केले. व्हॉईस ऑफ मिडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, उपाध्यक्ष भूषण सावंत, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष विष्णू धावडे, सचिव संजय पिळणकर, खजिनदार शैलेश मयेकर, संघटक आनंद कांडरकर, नागेश दुखंडे, सह खजिनदार वासुदेव गावडे, सुयोग पंडित, राजेश हेदळकर, चिन्मय घोगळे, सुमित दळवी,प्रथमेश गवस, शंकर जाधव उपस्थित होते