सिंधुदुर्ग एस टी महामंडळ अधिकारी वर्गाकडून चर्मकार समाजातील विधवा निराधार महिलेवर अन्याय

हेतूपुरस्कर रित्या वेंगुर्ला व सावंतवाडी मधील निविदा रद्द करून करण्यात आला अन्याय

कणकवली प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सन 2023 रोजी वाणिज्य आस्थापना साठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर निविदेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यतील चर्मकार समाजातील महिला भगिनी यांनी वेंगुर्ला व सावंतवाडी बसस्थानक येथील वाणिज्य आस्थापना निविदा भरलेल्या होत्या. सदर वेंगुर्ला व सावंतवाडी बसस्थानक मधील निविदा भरल्यानंतर आपल्या उच्चतम भाडे निकषांनुसार श्रीमती आरती एकनाथ चव्हाण रा. कुडाळ कुंभारवाडी व इतर चर्मकार समाजाच्या भगिनी यांना मुलाखतीचे पत्र कार्यालाकडून आले होते. त्यानुसार सदर मुलाखती साठी सर्व कागदपत्रांच्या सहित उपस्थित राहिले. सदर निविदाकारांनी कार्यालयाचे नियोजित भाडे पेक्षा जास्त दराने व इतर आस्थापनाधारक यांच्या पेक्षा हि जास्त दराने भरलेली होती. इतर सर्व बसस्थानक मधील निविदा धारकांना नियुक्ती पत्र व जागा तात्काळ देण्यात आल्या. परंतु यातील निविदा ह्या फक्त वेंगुर्ला व सावंतवाडी मधीलच चर्मकार समाजाच्याच व्यक्तीच्या असल्याने बेकायदेशीर रित्या पद्धतीने रद्द करण्यात आल्या. याचा जाब विचारण्यासाठी म्हणून भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटतेनेच्या वतीने विभाग नियंत्रक अभिजित पाटील व विभागीय वाहतूक अधिकारी देशमुख यांची भेट घेण्यात आली. राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी आपण गरीब निराधार चर्मकार समाजाच्या महिलेवर हेतू पुरस्कर रित्या असे कृत्य आपणाकडून केले आहे हे निदर्शनास आणून देऊन आरोप केला.
सदर निविदा धारक ह्या चर्मकार समाजाची गरीब निराधार विधवा स्त्री असून एकुलती एक मुलगी हि त्यांची अपंग आहे. सदर निविदा धारक यांचे चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबवून त्यांचे उदरनिर्वाह चे साधन काढून घेण्यात आले. आपण इतर सर्व बसस्थानक यांच्या निविदा मंजूर करून नियुक्ती पत्र व जागा दिल्या परंतु होतकरू चर्मकार समाजाच्या निविदा सिंधुदुर्ग कार्यालयाकडून हेतुपुरस्कर बेकायदेशीर रित्या रद्द करुंण त्यांच्या वर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे असे स्पष्ट दिसते. नियमबाह्य पद्धतीने आपल्या कार्यालायाकडून सदर निविदा का रद्द करण्यात आल्या याचा तात्काळ खुलासा व्हावा असे खडसावून जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी विचारले.
सदर निविदा रद्द केल्यामुळे निविदाधारक यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सदर निविदा त्यांना मंजूर करून नियुक्ती पत्र व जागा तात्काळ न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत असे सदर निविदाधारक यांच्या कडून इशारा देण्यात आला आहे. आपण उपासमारीची वेळ आणली असल्याने व त्या व्यक्तींनी आत्मदहन केल्यास त्याची व त्यांच्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील त्यामुळे या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन घडलेल्या अनुचित गैरप्रकाराचा तमाम भारतीय चर्मकार समाजच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहोत असे महिला वर्गानी उपस्थित असलेल्या विभाग नियंत्रक यांना ठणकावून सांगितले.
आपल्या एस. टी. महामंडळ कणकवली विभाग मधील अधिकारी वर्गाकडून चर्मकार समाजावर हेतुपुरस्कररित्या अन्याय झालेला आहे व चर्मकार समाजाच्या व्यक्ती यांनाच वंचित ठेऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणून त्यांची छळनुक करण्यात येत आहे असे स्पष्ट चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे अश्या घटना हि संघटना खपवून घेणार नाही. असे चर्मकार समाजाचे सर्व कार्यकर्ते यांनी सांगितले. तरी सदर अर्जाचा सहानभूती पूर्वकविचार करून वेंगुर्ला व सावंतवाडी बसस्थानक मधील निविदा तात्काळ मंजूर करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात यावे अशी मागणी चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी उपस्थित आरती चव्हान, राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सी. आर. चव्हाण, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव, कोकण विभाग उपाध्यक्ष बाबल पावसकर, महिला जिल्हा अध्यक्ष मानसी चव्हाण, महिला जिल्हा उपाध्यक्ष आकांशा चव्हाण, राज्य संचालिका मालिनी चव्हाण, सदस्य वृषाली चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, सहसचिव अंकुश चव्हाण, मालवण अध्यक्ष भूषण पाताडे, जिल्हा संघटक तुळशीदास पवार, गुरू तेंडोलकर, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष रमेश कुडाळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page