माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्मसाठी मदत कक्ष सुरू..‌

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मोफत सुविधेचा आज थाटात शुभारंभ सुरू करण्यात आला आहे. दरम्यान माठेवाडा सालईवाडा, जुना बाजार, मच्छी मार्केट, उभा बाजार या भागातील महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन श्री. आडिवरेकर यांनी केले आहे.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अमित गवंढळकर, परीक्षेत मांजरेकर, नागेश जगताप, नंदू गावडे, खुशी पवार, राहिल सासोलकर, गौरव बांदेकर, अनुराधा पवार, अमीशा सासोलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page