राजन पोकळे:मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन…
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातशिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यामाध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातयेणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री केसरकर याच्या वाढदिवस निमित्त शालेय
शिक्षणमंत्रीदीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघात उपस्थितराहणार असून वाढदिवसानिमित्त विविध सामाजिककार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सावंतवाडीतमध्ये युवा रक्तदाता संघटनेच्यापुढाकारातून रक्तदान शिबीर, अभिनव फाउठंडेशनलारूग्णवाहिका भेट देण्यात येणार असून त्याच संचलनयुवा रक्तदाता संघटना करणार आहे अशी माहिती राजन पोकळे यांनी दिली. तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने’ ऑनलाईन समुह नृत्य’ स्पर्धा, ‘भजन महोत्सव’ २०२४च आयोजन करण्यात आलं आहे. १८ जुलैपासून पुढील आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. वेंगुर्ला येथे ९७ जुलैला शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व सचिन वालावलकर मित्रमंडळ आयोजित आषाढी एकादशीनिमित्त जिल्हास्तरीय अभंग गायनस्पर्धा, जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. १८ जुलेला वेंगुर्ल भाजी मार्केट हनुमान मंदिरात लघुरुद्र, हॉलिबॉल स्पर्धा, प्राथमिक शाळां मध्ये वृक्षारोपण, बाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा व वेताळ प्रतिष्ठान, तुळससाठी रुग्णवाहिका लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. मान्सुन महोत्सव अंतर्गत १८ तेर
पर्यंत दशावतार नाट्यमहोत्सव होणार आहे. दोडामार्ग तालुक्यात
देखील विविध सामाजिक उपक्रमराबविण्यात येणार आहेत. यामध्ये मॅरोथॉन स्पर्धा, रूग्णांना फळवाटप, जीवनावश्यक वस्तूंच वाटप आदीविविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीपत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी माजीउपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना तालुकाप्रमुखबबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, युवा रक्तदातासंघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, प्रथमेश प्रभू, सायलीहोडावडेकर, पूजा नाईक, शिवानी पाटकर, विश्वास घाग आदी उपस्थित होते