छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनातला आदर सदैव अखंड राहील – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन..

सावंतवाडीत राजे प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचे विशाल परब यांच्या शुभहस्ते वितरण

सावंतवाडी (प्रतिनिधी)
श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे भोसले महाराज संस्थापक “राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य” या संघटनेचा विविध पुरस्कार वितरण सोहळा आज सावंतवाडी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार….

पडला.

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग तर्फे देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या विविध पुरस्कार वितरण आणि सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आज राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गचे प्रधान कार्यालय न्यू सबनीसवाडा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार मा.सोनाली बांदेलकर, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी यांना मानपत्रासह अर्पण करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचे उद्घाटन व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला. श्री नारायण सावंत या सावंतवाडीच्या सुपुत्राची भाजप कामगार मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.श्री. संतोष तळवणेकर यांना यावेळी लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार-२०२४ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

“समाजात आदर्शवत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवत त्यांना सन्मानित करण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या सेवा आदर्शाची प्रेरणा सर्वांच्या मनात पुन्हा जागृत झाली आहे. छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनात असलेला नितांत आदर यापुढेही सदैव अखंड राहील”, असे प्रतिपादन यावेळी भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी केले आहे.

याप्रसंगी विशालजी परब यांच्यासमवेत ॲड.अनिल निरवडेकर, सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.सुधीर आडिवरेकर, मा दिलीप भालेकर, श्री श्याम सावंत, राजे प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका प्रमुख श्री संजय गावडे, तालुका संघटक श्री आनंद प्रकाश सोनसरे, जिल्हा खजिनदार श्री ज्ञानेश्वर पारधी, पूजा गावडे, रेवती मुंडेलकर, सरिता भिसे, मनीषा गावडे, सायली गावडे, अपंग संघटनेचे श्री. महेंद्र चव्हाण, राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष तळवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page