पिंगुंळी रवळनाथ मित्र मंडळ आयोजित डबलबारी सामना कार्यक्रमाचे आयोजन!
कुडाळ (प्रतिनिधी)
पिंगुंळी गावातील तरुणांमध्ये समाजसेवेचे व्रत आणि मा आमदार वैभव नाईक यांचे विचार रुजवुन समाजसेवेकडे तरुणांना वळवण्यासाठी युवा उद्योजक दीपक धुरी सारखा प्रामाणिक कार्यकर्ता पिंगुंळी गावात काम करतो याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केले
पिंगुंळी श्री रवळनाथ मित्र मंडळ पिंगुंळी आयोजित श्री रवळनाथ मंदीरांमध्ये डबलबारी भजनाचा कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री बंगे यांच्या हस्ते झाले यावेळी श्री बंगे बोलत होते
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ कनयाळकर, माजी पोलीस पाटील श्री अरुण धुरी, माजी सरपंच निळकंठ राऊळ, पोलीस बिट हवालदार श्रीम जाधव, मनोहर गावडे, राघोबा धुरी, भाऊ पिंगुळकर, आनंद गावडे, अनिल धुरी, बुवा शुभम पाळेकर, बुवा स्वप्नील मेस्त्री उपस्थित होते
यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले कुडाळ मालवण मतदारसंघात काम करताना मा आमदार वैभव नाईक यांनी एक विचारांची फळी निर्माण केली आणि आजही पिंगुंळी गावात वैभव नाईक यांच्या विचाराचा तरुण वर्ग पहायला मिळतो त्यातच युवा उद्योजक दीपक धुरी सारखा तरुण समाज सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतुन श्री नाईक यांची विचारधारा तरुणांपर्यंत पोचवण्यासाठी काम करतो म्हणुनच आज या रवळनाथ मंदीरांमध्ये प्रचंड गर्दी मध्ये डबलबारी भजनाचा कार्यक्रम होत असताना तरुणांची एवढी उपस्थिती पाहुन आपण समाधानी आहे असे सांगुन पिंगुंळी गावाचा रक्षण कर्ता म्हणून श्री देव रवळनाथ असुन या देवतेच्या आशिर्वादाने इथल्या लोकांचे निरोगी आरोग्य व भरभराट होईलच परंतु युवा उद्योजक दीपक धुरी सारखा तरुण राजकीय सामाजीक क्षेत्रात पुढे जाऊदेत असेही श्री बंगे यांनी सांगितले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ कनयाळकर यांनीही आपले विचार मांडले तसेच बिट हवालदार श्रीम जाधव यांनीही विचार मांडले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, श्री दीपक राऊळ आणि ग्रामस्थ व भजन प्रेमी यांनी मोठी गर्दी केली होती
