ॲड सुहास सावंत:प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र सुशेगात
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
उद्या दिनांक १६ जुलै सकाळी ११.०० वा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करून समाजाला नाहक त्रास देण्याचा,विनाकारण अडवणूक करण्याचा प्रयत्न प्रशासना करत आहे,आणि लोकप्रतिनिधी मात्र सुशेगात आहेत याचा जाब विचारण्यासाठी जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे
१)यावर्षीच्या शैक्षणिक प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या MHT-CET च्या फॉर्ममध्ये SEBC आरक्षणाचा उल्लेख कुठेही केला गेला नाही…
२) डिप्लोमा आणि डिग्री कोर्सच्या ॲडमिशन साठी फॉर्म भरताना SEBC मधून फॉर्म न भरून घेतल्यामुळे १००० पेक्षा जास्त मुलांचे नुकसान झाले आणि यावरही शिक्षण खात्याकडून कोणतेही लक्ष दिले गेले नाही…
३)आणि आता तर जात पडताळणी साठी सुद्धा “जात पडताळणी समितीकडून” मराठा समाजाची अडवणूक केली जात आहे.
‘काय तर म्हणे तुम्हाला आरक्षण कोट्यातून
ॲडमिशन मिळणार नाही म्हणून जातपडताळणी देता येत नाही’.
जणू काही समाजकल्याण खाते यांच्या घरचे आहे.
म्हणजे प्रत्येक वेळी प्रशासनाच्या अडाणीपणा मुळे मराठ्यांनी प्रत्येक वेळी अन्यायच सहन करायचा का???
मराठ्यांनो आता तरी जागे व्हा.आताही झोपून राहिलात तर पुढची पिढी शिक्षणाशिवाय बेरोजगार होईल.मग क्रिकेट मॅच आणि राजकीय नेत्यांच्या पाठून लाचारी करणे याशिवाय काहीही मार्ग नसेल…
समाजाच्या या सर्व समस्यांच्या बाबतीत तोडगा काढायला आणि निर्णय घेण्यासाठी सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग कडून घेराव घालण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थी,पालक आणि सर्व समाज बांधवांनी उद्या सकाळी ठीक ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उपस्थित रहावे.
