बांदा (प्रतिनिधी)
इनरव्हिल क्लब बांदाच्या वतीने बांदा येथील निवृत्त जेष्ठ शिक्षक अन्वर खान यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सत्कार केला. बांदा येथील जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य अन्वर खान यांची या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी क्लबच्या वतीने निवड करण्यात आली होती. त्यानुसार इनरव्हील क्लब बांदाचे अध्यक्षा अर्चना पांगम, सेक्रेटरी प्रियांका हरमलकर, एडीटर अक्षता साळगावकर, माधवी गाड, सोनाली राणे आदी सदस्य उपस्थित होत्या. यावेळी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत खान सर यांचा सत्कार केला.