नूतन जिल्हा खजिनदार पदी अॅड मोहन पाटणेकर यांची निवड…
कुडाळ प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे कुडाळ तालुका अध्यक्ष पदी वाडोस चे सुपुत्र आर के सावंत व जिल्हा खजिनदार अॅड मोहन पाटणेकर यांची जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली. तसेच संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला
यावेळी उपाध्यक्ष मिलिंद धुरी सचिव विष्णू चव्हाण खजिनदार अॅड. मोहन पाटणेकर, आनंद कांडरकर, नामदेव जानकर, महीला जिल्हाध्यक्ष दर्शना केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी सौ. मानसी परब श्रीमती मेस्त्री, मनोज तोरस्कर, मनोज वाजे ऋषिकेश कोरडे, श्री चव्हाण श्री. नारकर आदी उपस्थित होते श्री. सावंत गेली २० ते २५ राजकारणा बरोबर ही समाज कारणात ही सक्रिय असतात. मागील पाच वर्ष कुडाळ पंचायत समिती उपसभापती पद भूषविली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुकाध्यक्ष पदी कार्यरत आहेत. समाजकारणाचा नेहमीच आवड असणारे व्यक्तिमत्व प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असल्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.