*डेगवे येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना.
सावंतवाडी प्रतिनिधी
डेगवे गावातील नुकसानग्रस्त भागाची योग्य ती पाहणी करा, तात्काळ शासकीय स्तरावरून सर्वेक्षण होऊन योग्य ती मदत नुकसानग्रस्त बांधवांना झाली पाहिजे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणे, आपले नैतिक कर्तव्य आहे ते तुम्ही बजावले पाहिजे, अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी केल्या.
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. सुधाकर देसाई यांच्या नुकसानग्रस्त घराची पाहणी करुन संबंधित विभागाला योग्य सहकार्य व कारवाई करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी दिल्या.
यावेळी अर्चना घारे – परब, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष विवेक गवस, प्रसाद परब , बाळकृष्ण देसाई, महादेव परब , सलील देसाई , विजय देसाई , चंद्रकांत देसाई , सुनील देसाई , मंदार देसाई , साहिल देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.