श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद..
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार यांना ग्रामसेवक यांनी सही बंद केली आहे. त्यामुळे सर्व कामगार यांचे लाभ थांबलेले आहेत. कामगार वर्ग पूर्णपणे व्यथित आहे.
जिल्ह्यातील अनेक कामगार यांनी आपली व्यथा कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या कानी घातली त्याची दखल प्राजक्त चव्हाण यांनी तत्काळ घेऊन रविवारी दी 28 जुलै ला तातडीची बैठक पणदुर हायस्कूल येथे आयोजित केली. सदर बैठकीत 8 तालुक्यातून सर्व कामगार उस्फुर्त प्रतिसाद देऊन उपस्थित राहिले. सर्व कामगार यांनी आपल्या गावातील ग्रामसेवक आपल्या संघटनेचे पत्र दाखवून सही देत नाहीत अशी खद खद व्यक्त केली. यावेळी उपस्थित कामगार वर्गाला मार्गदर्शन करत असताना श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, स्वाभिमान कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे व भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी कामगार वर्गाला पुढील वाटचाल कशी करावी करावी यासाठी संबोधित केले. आपल्या कामगार वर्गाच्या पाठी आम्ही ठाम पने आहोत येत्या दोन तीन दिवसात कामगार यांच्या साठी सनदशिर मार्गाने लढा सुरू करणार आहोत.
कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व प्रसाद गावडे यांनी कामगार वर्गाला संबोधित करताना ग्रामसेवक जे सांगतात ते फक्त त्यांनी लेखी लिहून द्यावे असे कामगार वर्गाला सांगीतले. पंढरी चव्हाण यांनी ग्रामसेवक हे नोंदणी अधिकारी नसून त्यांनी मालक किंवा कॉन्ट्रॅक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची खातरजमा करून त्यांनी प्रमाणित करावे आणि असे करत नसतील तर आपण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मार्ग काढू असे सागितले.
सरतेशेवटी प्राजक्त चव्हाण व प्रसाद गावडे यांनी सर्व कामगार वर्गाना आम्ही आपणास न्याय नक्की मिळवून देऊ असे आश्र्वासित केले. गरज पडल्यास मंत्रालय पातळीवर ही लढा देण्यास आम्ही ठाम आहोत असे सांगितले. यावेळी उपस्थित श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, स्वाभिमानी कामगार संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे, भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, लोकमत पत्रकार मिलिंद डोंगरे व जिल्हा संघटक भूषण पाताडे व सदस्य अंकुश चव्हाण उपस्थित होते.