मंत्री दिपक केसरकर:कावळेसाद वरील जमिनीवर कोणाचा डोळा,जिल्ह्यात जमिन खरेदी करण्याचा सपाटा कोणी लावला
आंबोली प्रतिनिधी
कावळेसाद येथील जमिनिवर कोणाचा डोळा आहे, सिंधुदुर्गात सध्या जमिनी विकत घेण्याचा सपाटा कोणी लावला असे संतप्त सवाल करीत आंबोली, गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्री आपण गेली वीस वर्षे लढा देत आहे हे गेळे येथील मंडळीनी तेथील रवळनाथ मंदिर येथे येऊन देवाला स्मरून नाकारावे असे आवाहन शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे.
कोणीतरी आपला मतदारसंघ आरक्षीत झाला म्हणून आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात येऊन स्वतःच्या स्वार्थाचे राजकारण करून गावातील मंडळींची दिशाभूल करीत असेल व गावकरी त्याला बळी पडत असतील तर हे योग्य नाही खऱ्याखोट्याचा न्यायनिवाडा हा परमेश्वर निश्चितच करेलच असे सांगत तुम्ही तुमचे
राजकारण जरूर करा मात्र त्या राजकारणात मला ओढू नका अस
राजकारण जरूर करा मात्र या राजकारणात मला जादू नका जता आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला आहे.
गेळे जमीन वाटप प्रश्नी शिक्षण मंत्री दीपक केसरकर खो घालत असल्याचा आरोप करीत आहे ग्रामस्थांनी प्रसंगी गाव बंदी करू असा निर्णय घेतला होता यावर आज बोलताना केसरकर यांनी कावळे साद येथील जमीन राखीव ठेवण्याचे सांगण्यात आले होते मात्र शासनाला जेवढ्या जागेची गरज आहे तेवढीच घेऊन बाकीची जागा वाटप केली जाणार आहे, मात्र ज्यांना जमिनीमध्ये स्वारस्स आहे, कावळे साद मधील जमिनीवर ज्यांचा डोळा त्यांचा शोध गेळे वासियांनी घ्यावा असे आवाहन केले.
ज्यांनी जिल्ह्यात जागा घेण्याचा सपाटा लावला आहे, अनेक ठिकाणच्या जागा खरेदी केल्या जात आहे त्यामुळे गेळे कावळेसाद जागेवर कोणाचा तरी डोळा असेल असा टोला शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी लगावला.