शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या प्रयत्नांना यश…..

सोनवडे तर्फे हवेली शाळा क्र.१ येथील सागाची धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनविभाग तसेच शिक्षणाधिकारी यांचे वेधले होते लक्ष…

कुडाळ प्रतिनिधी
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फे हवेली शाळा क्र १ येथील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यामुळे १९ सागाच्या धोकादायक झाडांपैकी १ झाड उन्मळून पडल्यामुळे पालकांनी ५ दिवस मुलांना शाळेत पाठवले नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले यावेळी १० झाडे हटविण्यासाठी उपवसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांच्याकडून आज परवानगी देण्यात आली.हे काम पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कुडाळ श्रीम.ऐश्वर्या काळूसे मॅडम,वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार,यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांचे तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी उपस्थित पालक श्री.बाळकृष्ण मेस्त्री,श्री.महिपाल धुरी,श्री.रुपेश कदम,श्री.वैभव हिवाळेकर,सौ.आकांशा धुरी,सौ.शर्वरी सोनवडेकर,सौ.राखी सोनवडेकर,सौ.समिधा धुरी,सौ.सलोनी सोनवडेकर,सौ.अंकिता सोनवडेकर,सौ.मानसी सोनवडेकर,सौ.दर्शना कदम,श्री.संतोष परब,श्री.प्रकाश धुरी,श्री.संदेश बळी,श्री.यशवंत धुरी,श्री.अमित सोनवडेकर,श्री.किशोर धुरी आदी पालक शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page