श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व इतर संघटना यांचा पाठपुरावा सुरू
ओरोस प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधून बांधकाम कामगार यांच्या नोंदणी व रीनिवल करण्यासाठी लागणाऱ्या दाखल्या वर ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार संघटनानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधू कामगार संघटना अध्यक्ष अशोक बोवलेकर व सर्व तालुक्यातून आलेले कामगार प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कामगार यांची झालेली अडचण सोमवारी दूरध्वनी वरून सांगितली व वेळ घेण्यात आली, त्यानंतर मंगळवारी सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यात आली. याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन कामगार अधिकारी तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कुडाळ गट विकास अधिकारी व ग्रामसेवक युनियन यांच्या सोबत चर्चा ही करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख साहेब यांनी तात्काळ सदर निवेदन वर रिमार्क देऊन लवकरच मार्ग काढू असे आश्र्वसित केले.
तसेच ग्रामसेवक राज्य संघटना यांनी निवेदन दिल्याने सर्वच जिल्ह्यात कामगार यांना अडचणी होत आहे मंत्रालयीन वरिष्ठ पातळीवरील सदर विषय असल्याने श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार यांना होत असलेल्या त्रासामुळे दोन दिवसात महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब, कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेब व सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांची सर्व संघटना यांच्या समवेत भेट घेण्यात येणार आहे. यातून लवकरच मार्ग काढण्यात येणार आहे. जो पर्यंत कामगार वर्गाला न्याय मिळत नाही तो पर्यंत कामगार वर्गासाठी श्रमिक कामगार संघटने मार्फत पाठ पुरावा सुरू ठेवण्यात येणार आहे.