मालवण-कांदळगाव येथे खवले मांजरास जीवनदान…

वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात करण्यात आले मुक्त

मालवण प्रतिनिधी
मौजे कांदळगाव येथे खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याची माहिती स्वप्निल गोसावी यांनी श्रीकृष्ण परीट वन परिमंडळ मालवण यांना दिली त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता.सदर खवले मांजर संतोष पारकर गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या नजरेस पडले त्यांनी सदरची घटना पार्थ डिज्वलकर यांना सांगून वनकर्मचारी यांच्या मदतीने सुखरूप सुटका करून वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांचे ताब्यात दिले खवले मांजर जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून समाजात असलेल्या गैरसमजामुळे दुर्मिळ होत चाललेली वन्य जीवांची प्रजात आहे. खवले मांजर वन्यजीव अधिनियम 1972 मधील शेड्युल एक मध्ये असून त्याला डिवचने पकडणे त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे. सदरचे बचाव कार्य उपवनसंरक्षक मा. श्री नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक मा. श्री सुनील लाड, वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण परीट परिमंडळ वन अधिकारी मालवण, अनिल परब वनकर्मचारी, ग्रामस्थ संतोष पारकर, पार्थ डीच्वलकर नारायण मिस्त्री लवेश आयकर तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट चे सदस्य स्वप्निल गोसावी, दर्शन वेंगुर्लेकर यांचे उपस्थित पार पडले. सदर खवले मांजरास पशुधन विकास अधिकारी मालवण श्री रवींद्र दळवी यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्त असता.सदर करण्यात आले.कोणताही वन्यप्राणी लोकवस्ती किंवा विहिरीत पडल्याची घटना घडल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क करण्याचे आव्हान करून कांदळगाव ग्रामस्थांचे व युथ बीट फॉर क्लायमेटच्या सदस्यांचे परिमंडळ वनाधिकारी मालवण श्री श्रीकृष्ण परीट यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page