सावंतवाडी प्रतिनिधी
बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय?’ यावर २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मुक्ता चैतन्य यांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मुले, आई- वडील, आजी-आजोबा आणि शिक्षकांसाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम असून सर्वांनी उपस्थित
राहवे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे. या शिबिरात सायबर पालकत्व का महत्वाचे आहे? का समजून घेतले पाहिजे, सायबर क्राईम मुलांना असलेले धोके, मुलांचा स्क्रिन टाईम कमी करणार कसा, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’वर २९ रोजी मार्गदर्शन
