युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा केला जाणार सत्कार
रविवार ११ ऑगस्ट रोजी कणकवलीत होणार सत्कार सोहळा..
कणकवली (प्रतिनिधी)
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS २०२४ परीक्षे मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे होणार आहे. यावेळी जिजाऊ संस्था अध्यक्ष निलेश सांबरे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि माजी जि प अध्यक्ष सौ संजना संदेश सावंत यांनी केले आहे.
विमान प्रवासा सह ईस्रो सहल आणि लाखो रुपयाची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS-2024 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा असून यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील आदर्श शिक्षकांचा सत्कार केला जाणार आहेत STS-2024 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना १८ जून ते २१ जून या कालावधीत विमानाने त्रिवेंद्रम (केरळ) येथे ईस्त्रो सहलीला नेण्यात आले होते तसेच २ री व ३ री मधील १० गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटर ची भेट घडविण्यात आली.
इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील जिल्हा गुणवत्ता
यादीतील २५० विद्यार्थ्यांना रोख अडीज लाखाची रोख बक्षिसे, मेडल
व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी यवा
संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे