अन्यथा युवासेनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर आंदोलन छेडणार-योगेश धुरी युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ
कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यात नवीन पोलीस पाटील यांची निवड झाली 3 महिने उलटूनही अद्याप त्यांना नियुक्ती दिली नाही.
■ जिल्ह्यातील सत्ताधिकारी जनता दरबार घेतात मात्र अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात
■ राणे मंत्री असून एक उद्योग जिल्ह्यात नाही उलट राणेंच्या काळात उद्योग बंद करण्यात आले
■ पालकमंत्री जिल्ह्याचे असून आता पर्यंत झालेल्या सर्व रिक्त जागांवर परजिल्ह्यातील लोकांना भरण्यात आले.
■तलाठी भरतीत परजिल्ह्यातील उमेदवार भरण्यात आले
■शिक्षक भरतीत परजिल्ह्यातील उमेदवार भरण्यात आले
■ जिल्ह्यातील युवकांना नोकरी देण्यापेक्षा निवडणुकीत दारू पार्ट्या घालून युवकांच आयुष्य बरबाद करण्याचं काम भाजप ने केलं
■ पहिल्यांदा च कुठे पोलीस पाटील जागेच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक युवती यांची निवड झाली तर राजकारण करून भाजप शिंदे सरकार ने जाणून बुजून ह्या निवड झालेल्याना नियुक्ती देत नाही आहेत.
■कुडाळ तालुक्यात निवड झालेल्या पोलीस पाटील यांना नियुक्ती द्या अन्यथा युवासेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन प्रांत कार्यालयावर करण्यात येईल असे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.