भाजपा प्रवक्ते संजू परब व युवा नेते संदीप गावडे यांचा कडव्या शब्दात इशारा
सावंतवाडी प्रतिनिधी
माजी मंत्री रामदास कदम यांनी माफी मागावी, आमचे नेते रविंद्र चव्हाण माफ करतील, तेवढं मोठं मन त्यांचे आहे. अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती असली तरी, दिपक केसरकर यांचा पराभव करणार, असा इशारा मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय तथा भाजपा युवा नेते संदिप गावडे यांनी दिला.
यावेळी माजी नगराधक्ष तथा सिंधुदुर्ग भाजपा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब, माजी सभापती सुधीर आरिवडेकर, सौ. रोहिणी मडगावकर उपस्थित होते
माजी मंत्री रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत भाजपा कार्यालयासमोर रामदास कदम यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी तीव्र निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी देवसू सरपंच रुपेश सावंत, गेळे सरपंच सागर ढोकरे, अमोल सावंत, मनीष परब, अनिकेत आसोलकर, परीक्षीत मांजरेकर, किसान धोत्रे, दीपक पास्ते, गुरुनाथ पास्ते, विठ्ठल परब, मयूर लाखे, दीपक लाखे, शिवाजी पाटील, सुभाष लाखे आधी उपस्थित होते.