कोळंबच्या सरपंच सौ. सिया धुरी भाजपमध्ये दाखल…

ठाकरे शिवसेनेला धक्काः निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश..

मालवण प्रतिनिधी
ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कोळंब ग्रामपंचायतीत गेले काही महिने सुरु असलेली राजकीय धुसपूस आणि सरपंच सौ. सिया धुरी व उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यातील कलह समोर आला असताना लोकनियुक्त सरपंच असलेल्या सौ. सिया धुरी यांनी आज माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे. दीड वर्षे सरपंच म्हणून काम करताना अडचणी आल्या, समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे गावाच्या विकासासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगून भाजपा नेते निलेश राणे यांनी गाव विकासासाठी जास्तीत जास्त विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही सौ. धुरी यांनी सांगितले.

मालवण भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी सरपंच सौं. सिया धुरी यांच्या समवेत परमानंद कदम, चंद्रकांत धुरी, कांचन धुरी, सुनील परब, प्रीती परब, प्राजक्ता परब, वेदिका परब, दिपिका कदम, स्वप्ना कदम, कमलाकर कदम, मानसी धुरी, सुषमा परब, रवींद्र परब, रविना परब, चेतन धुरी, मारुती पवार, प्रिया पवार, ओंकार परब, अक्षय कदम, साहिल परब यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे भाजप नेते निलेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदीविक्री संघ तालुकाध्यक्ष राजन गांवकर, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी उपासभापती राजु परुळेकर, दाजी सावजी यांसह अन्य पदाधिकारी तसेच माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल निव्हेकर, शक्ती केंद्रप्रमुख मंगेश चव्हाण, विजय ढोलम, संदीप परब, भाऊ फणसेकर, उज्वला करलकर, संदीप भोजने, भाऊ लाड, भाई ढोलम, सत्यवान लोके, विजय सारंग, शरद लोके, प्रसाद कामतेकर, बबन मलये, गोपाळ बागवे, दिनेश कोरगावकर, दीपक कोरगावकर, उमेश चव्हाण, संजय धुरी, तातोबा करलकर, सुशांत भोजने, हनुमंत धुरी, गणेश पेडणेकर, सचिन नरे, मंगेश कांदळगावकर उपस्थितीत होते.

यावेळी निलेश राणे यांनी कोळंब गावाच्या विकासाचे धोरण ठेवून सौं. धुरी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे गावात जास्तीत जास्त विकासनिधी देण्याची जबाबदारी आमची आहे. गाव विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमाणे नुसती पत्रे आम्ही देणार नाही तर निधी देऊन प्रत्यक्ष काम करू. ग्रामस्थांना अपेक्षित कोळंब गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सद्यस्थितीत गावच्या स्मशानभूमीसाठी आवश्यक निधी खा. नारायण राणे यांच्या खासदार निधीतून तात्काळ उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page