अतुल बंगे मित्र मंडळ आणि शिवसेना, युवा सेना आयोजित दहीहंडी कार्यक्रमाची रेलचेल मंगळवारी हुमरमळा बाजारपेठेत..!

कुडाळ प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतुल बंगे मित्र मंडळ आणि शिवसेना युवा सेना आयोजित ५५५५/ गाव मर्यादित दहीहंडी व तालुक्यातील दहीहंडी पथकांना पाच थर सलामी ३३३३/ अशी बक्षीसे आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती युवा सेनेचे मितेश वालावलकर यांनी दिली,
आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा वालावल गावासाठी कोट्यावधी रुपये निधी देऊन ग्रामस्थांना दीलेले आश्वासन पुर्ण केल्याबद्दल ”कार्यसम्राट”’आमदार म्हणून गावाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे मंगळवारी २७ रोजी संध्याकाळी ४ वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम निवेदक श्री स्नेहल सामंत यामध्ये विजेता पैठणी साडी, द्वितीय मिक्सर, तृतीय कुकर व भाग घेणा-या महीलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे, तसेच गावातील दहावी बारावी व विशेष अभ्यास क्रमामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार सोहळा भेट वस्तू देऊन तसेच गावातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम , देवगड नानिवडे येथील ढोल पथक, डीजेच्या तालावर पाण्याची बरसात ,भव्य मोटारसायकल रॅलीने आमदार वैभव नाईक यांचे पुष्पवृष्टी करीत भव्य स्वागत करण्यात येणार आहे तालुक्यातील दहीहंडी पथकांनी सहभाग घ्यावा 9421935068 असे आवाहन सरपंच श्री अमृत देसाई, युवा सेना विभाग प्रमुख मितेश वालावलकर, शाखाप्रमुख रमेश परब, युवा सेना शाखा प्रमुख संदेश जाधव यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page