कुडाळ (प्रतिनिधी)
तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कुडाळ येथील
तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवेज अब्दुल नाईक (रा. सरंबळ-दुर्गावाड, ता. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार काल घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संबधित तरूणी कामावरून घरी जात असताना संशयिताने तिचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने नकार देऊनही संशयीताने तिचा पाठलाग केला तसेच तिच्या आईच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज पाठविले आहेत.
तसेच आपल्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अशी तक्रार त्या तरुणीने पोलिसात दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.