पालकमंत्री यांनी नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्यावा
केसरकरांनी माफी मागावी अन्यथा केसरकरांना शिवप्रेमी हिसका दाखवतील:योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ
कुडाळ प्रतिनिधी
स्वतःला हिंदु रक्षक मानणारे आता मात्र गायब आहेत, हेच जर दुसऱ्यांच्या बाबतीत घडले असते तर एवढ्यात जाळपोळ केली असती.जिल्ह्यातील काही शिवप्रेमी हे पक्षाच्या दबावाखाली आहेत ही बाब लांजनास्पद आहे.त्या शिवप्रेमींना महाराजांपेक्षा पक्ष मोठा वाटतोय अश्या अनाजीपंतांचा जाहीर निषेध करत आहोत अशी प्रतिक्रिया योगेश धुरी व्यक्त केली आहे
जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी नैतिकता दाखवत राजीनामा द्यावा त्यांना खरच महाराजांबद्दल आदर असेल तरच ते राजीनामा देतील.
महाराज हे आमचं दैवत आहे आणि याबाबत कितीही गुन्हे दाखल होऊ देत मागे हटणार नाही
केसरकर ह्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसत जे जिल्ह्याचे होऊ शकले नाहीत ते महाराजांचे काय होणार, नको त्या प्रतिक्रिया देऊ नयेत केसरकरांनी माफी मागावी
ज्या भागातून जे नेते आमदारकिला उभे राहणार आहेत त्यांनी साधी दिलगिरी देखिल व्यक्त केली नाही यामुळे लोकांनी समजून जावं की महाराजांबद्दल किती जणांना आदर आणि प्रेम आहे
युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने आम्ही या घटनेचा तसेच मिंधे फडणवीस सरकारचा निषेध करीत आहोत.