आज पासून मंडळांची नांव नोंदणी सुरू
सावंतवाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी व संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात येणार आहे. याबाबत ची माहिती संदीप गावडे यांनी आज येथे दिली.
श्री संदीप गावडे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, भाजप युवा मोर्चाचे अजय सावंत, गेळे सरपंच सागर ढोकरे, चौकुळ माजी सरपंच गुलाब गावडे, अनिकेत आसोलकर, तानाजी गावडे आदी
उपस्थित होते. श्री. गावडे पुढे म्हणाले, श्री गणेश चतुर्थी सण तोंडावर आहे. कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणून आपण त्याकडे पाहतो चाकरमाने मोठ्या संख्येने या उत्साहासाठी आपल्या गावात येत असतात गावोगावी प्रत्येक वाडीवस्तीवर घरोघरी आरत्या भजन मोठ्या उत्साहात केली जाते. भजन म्हटलं तर एक धार्मिक वारसा आणि सांस्कृतिक चळवळ या ठिकाणी गेली कित्येक वर्ष पाहायला मिळते याच धार्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना स्वखर्चातून भजन साहित्य संच देण्याचा मानस मी केला आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीची अर्ज करण्याची प्रक्रिया
राबविण्यात येणार आहे उद्यापासून म्हणजेच दि. २९ ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर पर्यंत ही ऑनलाइन प्रक्रिया राहणार आहे. अर्ज करणाऱ्या भजन मंडळामध्ये किमान दहा सदस्य असणे गरजेचे आहे तसेच त्या सदस्यांचे मोबाईल नंबर व संबंधित
भजन मंडळ हे गावात कार्यरत आहे यासाठी त्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीचा दाखला गरजेचा आहे शिवाय त्या भागातील
9:51
भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष किंवा बूथ अध्यक्ष यांचे शिफारस पत्र अनिवार्य आहेत. अर्ज दाखल केलेल्या जास्तीत जास्त मंडळांना भजन साहित्य संच ४ सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी खालील लिंकचा वापर करावा तसेच वाटप कार्यक्रमाची वेळ व ठिकाण दि.३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 7588926262 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री गावडे यांनी केले.