महिला आणि बालगोपाळसह एकूण २८ गोविंदा पथकांचा समावेश…
कुडाळ प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत कोकणातील सर्वात मोठी दहीहंडी असलेला उत्सव उद्या शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी कुडाळच्या एसटी डेपोच्या मैदानावर साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्वशी, हास्यजत्रा फेम समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, गौरव मोरे, तसेच इतर अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत दिली