मनोज जरांगे पाटील यांची अर्चना घारे-परब यांनी भेट घेत केले रक्षाबंधन

सावंतवाडी प्रतिनिधी
मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जिवाची तमा न बाळगता समाजाला आपले कुटुंब मानून लढणारे मराठा समाजाचे नेते आदरणीय मा. मनोज जरांगे पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मालवण राजकोट येथिल दुर्देवी घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहाणी करण्यासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी त्यांची भेट घेत रक्षाबंधन केले.

आदरणीय मनोजदादा जरांगे मराठा समाजासाठी लढत आहेत. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झगडत आहेत. समाजासाठी झुंज देणाऱ्या भावाचे हात बळकट करण्यासाठी दादांना रक्षाबंधन केले. लाडक्या भावाला राखी बांधून मनोज दादांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या लढ्याला यश येवो अशी प्रार्थना महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या चरणी अर्चना घारे-परब यांनी केली‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page