कुडाळ (प्रतिनिधी)
मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना असु द्या कि़वा पंचक्रोशीतील गोरगरीबांना मिळणा-या योजना असुद्यात कर्तव्य दक्ष महसुल मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या मुळेच गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळतो असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी माड्याचीवाडी येथे काढले,
माड्याचीवाडी ग्रामपंचायत मध्ये माझी लाडकी बहिण योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तेंडोली,माड्याचीवाडी,हुमरमळा वालावल,पाट या भागातील लाडकी बहिण योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच विघ्नेश गावडे,म़डळ अधिकारी सौ श्वेता दळवी, तलाठी सुक्ष्मा गायकवाड,हुमरमळा पाट तलाठी सौ प्रितम भोगटे, तलाठी कु पुजा भोरे, तलाठी अनघा राणे, ग्रामसेवक माड्याची वाडी उपस्थित होते,
यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले कुठलीही योजना सध्या असली कि कुडाळ तहसिलदार श्री विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड, तलाठी प्रितम भोगटे या कर्तव्यदक्ष महसुल हुशार कर्मचारी असल्याने पंचक्रोशीतील गोरगरीबांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळत असुन मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना या पंचक्रोशीतील गोरगरीबांना मिळाव्यात यासाठी याभागातील महसुल यंत्रणा सुट्टीची तमा न बाळगता लोकांपर्यंत योजना पोचली पाहिजे यासाठी ही यंत्रणा काम करते ही कौतुकास्पद कामगिरी असुन आपल्या कुटुंबातील ही मंडळ अधिकारी, तलाठी असल्यासारखे लोकांना वाटते असे कौतुकाचे गौरद्वागार श्री बंगे यांनी काढले यावेळी अनेक लोकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रे व माहीती देण्यात आली यावेळी लाभार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबु गडकर व इतर उपस्थित होते