कुडाळ प्रतिनिधी
प्रतिनिधीजिल्हा रुग्णालय ओरस येथे मेडिकल कॉलेज झाल्याने जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालय ईमारत निर्लेखित करून ग्रामीण रुग्णालय आवारात अद्यावत जिल्हा रुग्णालय व्हावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवर योग्य इलाज होतील.
♦️कुडाळ शहारामध्ये जिल्हा रुग्णालय होण्याच्या मागणी करिता रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता बैठक श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा बाजारपेठ कुडाळ येथे आयोजित केली आहे. तरी कुडाळ शहरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. ही विनंती.