कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथील मानाच्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान यांच्यावतीने माजी नगर सेवक राकेश कांदे यांनी श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, सौ. प्रज्ञा ढवण, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मौर्ये, सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सरव्यवस्थापक के. बी. वरक, शरद सावंत, सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान पदाधिकारी राकेश नेमळेकर, संजू नेमळेकर तसेच
जिल्हा बँकेचे अधिकारी व सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान पदाधिकारी उपस्थित होते.