कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी युवा पिढी माफ करणार नाही

आशिष सुभेदार:मुलांचे होणारे नुकसान याला जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी द्यावे

सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरोनियम कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये. सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक युवकांना जिल्ह्या बाहेर काम करावे लागत आहे गोव्यासारख्या ठिकाणी येतात असताना अपघात होऊन अनेक युवक मृत्यू पडत आहेत त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात अनेकांना आपली मुले गमवावी लागत आहे त्यामुळे मातापित्यांचे शिव्या शाप घेण्यापेक्षा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून लोकांचे आशीर्वाद घ्यावेत नाहक कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही विरोनियम कंपनी ही दीपक केसरकर यांनी आणली होती त्या कंपनीचे मुख्य संचालक हे केसरकर यांचे मित्र होते त्यांना सिंदूरत्न मधून अनेक ठेके देण्यात आले होते
मात्र आता कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर यावर काहीच बोलण्यासाठी केसरकर तयार नाहीत त्यामुळे मुलांचे होणारे नुकसान जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी दयावे

आशिष सुभेदार
सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर समर्थक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page