तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांची पत्रकार परिषद
सावंतवाडी प्रतिनिधी
केसरकर यांनी अरोंदा येथे बोट हाऊस सुरू करू असे सांगून तब्बल चार वेळा पाहणी केली त्यासाठी खर्च केला तेवढा देखील त्यांनी निधी सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी उभारला नाही यावरून केवळ निवडणुका आल्या की लोकांची दिशाभूल करायची आणि त्यानंतर त्यावर पाठ फिरवायची असे एक कलमी कार्यक्रम केसरकर यांनी गेले अनेक वर्षात केलाय अशी टीका रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
दरम्यान केसरकारांनी निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळे उद्योगपती मतदारसंघात आणले त्यात विठ्ठल कामत प्रशांत कामत आणि हर साबळे यांचा समावेश होता. मात्र आता ते उद्योगपतीही नाही आणि उद्योग ही दिसत नाही, सातार्डे ते उत्तम स्टील मध्ये देखील ते प्रकल्प उपरणार होते तो देखील तो उभारू शकले नाहीत त्यामुळे केसरकर निवडणुकीच्या तोंडावर लोकांना फसवण्याचा काम करत असल्याने त्याची चौकशी देखील झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच आरोंदा येथे विठ्ठल कामत यांचा हॉटेल देखील सुरू होतो ते देखील आता बंद पडल्या त्यामुळे अनेक तरुण देखील त्या ठिकाणी बेरोजगार झाले असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
