बांदा प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी सिताकांत नाईक यांची तर महिला पोलीस हवालदार पदी हर्षदा सावंत व वेदिका गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
यावेळी पोलीस ठाण्याच्यावतीने निरीक्षक बडवे यांनी पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.