सांगेलीत विशाल परब यांच्या सहकार्यातून उभारलेल्या सभामंडपात नवरात्र उत्सव साजरा! शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिला पहिल्या आरतीचा मान!!
सावंतवाडी प्रतिनिधी
आज सांगेली येथील नवरात्र उत्सव मंडळातर्फे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर देवी दुर्गामातेच्या पहिल्या आरतीचा मान ग्रामस्थांनी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना प्रेमपुर्वक दिला. त्यामागे ग्रामस्थांची एक आस्था होती. किमान दहा वर्ष येथे नवरात्रीचा उत्सव होत असे. परंतु त्यासाठी पक्का मंडप नव्हता. यापूर्वीच्या श्री विशाल परब यांच्या सांगेली भेटदौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पंढरीनाथ राऊळ आणि कार्यकर्त्यांनी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणली त्याच वेळी श्री विशाल परब यांनी येणाऱ्या नवरात्रीत देवीचा कायमस्वरूपी मंडप उभा राहील असे वचन दिले होते. आपल्या शब्दांनुसार त्यांनी या मंडळाला सर्वतोपरी मदत केली आणि त्यातून सभामंडप आज नवरात्रीनिमित्त देवीच्या स्थापनेने सजला होता. दिला शब्द पुरा करणाऱ्या नेतृत्वाचा आज ग्रामस्थांनी त्याच सभामंडपात शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
या सत्काराला उत्तर देताना विशालभाई परब यांनी गावच्या विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. मी कधीही मतांसाठी गावात येत नाही, तर विकासाची संकल्पनाच घेऊन येतो. बोलण्यापेक्षा मी कृतीवर विश्वास ठेवतो. माझे प्रत्येक काम जनतेच्या भल्यासाठी असते, आणि या मंडपाचे बांधकाम हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. भविष्यातही या ठिकाणच्या युवा वर्गासाठी रोजगाराचा प्रकल्प घेऊन येण्याचा मी संकल्प केला आहे, त्यालाही तुमची साथ द्या असे आवाहनही यावेळी श्री विशाल परब यांनी केले.
नवरात्र उत्सवातील या कार्यक्रमात त्यांनी दुर्गा मातेचे आशीर्वाद घेत गिरीजानाथ देवस्थानालाही वंदन केले. या देवदेवतांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थांना सुखी, समृद्ध व आरोग्यदायी जीवन लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला महिला, युवा आणि ज्येष्ठ अशा शेकडो ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पंढरीनाथ राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, प्राध्यापक रामचंद्र घावरे, सरपंच लवू भिंगारे, श्री बाळ राऊत, श्री सागर सांगेलकर, श्री मनोहर राऊळ भगिनीवर्गाची उपस्थितही लक्षणीय होती.
श्री विशाल परब यांनी सांगली ग्रामस्थांसाठी स्वखर्चातून उभारून दिलेल्या या मंडपामुळे नवरात्र उत्सव मंडळ सांगेलीच्या कार्यास मोठा हातभार लागला आहे. हा भव्य सभामंडप आता भविष्यातील सार्वजनिक आणि धार्मिक कार्यांसाठी गावकऱ्यांना उपलब्ध राहणार आहे. श्री विशाल परब यांच्या विशाल कार्यामुळे आम्ही गावकरी प्रभावित आहोत आणि भविष्यकाळात नेहमीच त्यांच्या पाठीशी राहू, असे अभिवचन ग्रामस्थांच्या वतीने यावेळी श्री पंढरीनाथ राऊळ यांनी दिले आहे.